प्रियंका गांधी कर्नाटकात करणार व्यापक प्रचार – शिवकुमार

प्रियंका गांधी कर्नाटकात करणार व्यापक प्रचार – शिवकुमार

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी कर्नाटकात व्यापक प्रचार कामात सहभागी व्हावे, विषेशत: कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी सक्रिय सहभागी व्हावे अशी मागणी त्यांच्याकडे करण्यात आली असून त्याला त्यांनी सहमती दिली आहे असे कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की राज्यसभेची कर्नाटकातील जागाही प्रियंकांनी लढावी अशी पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्याचा कर्नाटकातील निवडणुकीवरही विधायक परिणाम होईल असे ते म्हणाले.
दक्षिणेकडील राज्यांत आगामी काळात अनेक ठिकाणी निवडणूक होणार असल्याने त्यांनी दक्षिणेकडील राज्यांमध्ये लक्ष दिले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. राज्यसभेची कर्नाटकातील जागा प्रियंका गांधी यांनाच द्यावी असा आग्रह पक्षाच्या बहुतांशी आमदारांनी धरला आहे तथापि त्याला मात्र प्रियंकांनी अजून अधिकृतपणे कोणताहीं प्रतिसाद दिलेला नाही.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

प्रियंका गांधी कर्नाटकात करणार व्यापक प्रचार – शिवकुमार

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm