बेळगाव : 'माय बेळगाव ॲप'च्या माध्यमातून सेवा-सुविधांची माहिती

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : 'माय बेळगाव ॲप'च्या माध्यमातून सेवा-सुविधांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. रुग्णवाहिका, प्रवासी ठिकाणांची माहिती, बस आदी सुविधांची माहिती ऑनलाईनच्या माध्यमातून मिळणार आहे, अशी माहिती स्मार्टसिटीचे व्यवस्थापक प्रवीण बागेवाडी यांनी दिली. शहरामध्ये 1 लाख १० 10 घरांना आरएफआयडी टॅग देण्यात आला आहे. दररोज कचऱ्याची उचल करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यात येत आहे. ही सेवा महापालिकेकडे हस्तांतर करण्यात आली आहे. राकसकोप जलाशयातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. लक्ष्मीटेक येथील जलकुंभांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेवरही नजर ठेवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी, यासाठी माय बेळगाव ॲपद्वारे रुग्णवाहिकेचे ठिकाणी शोधता येते. यामुळे नागरिकांना मदत होणार आहे. शहरात कोठेही कचरा टाकण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. कचरा टाकण्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी सूचना दुकानदारांना देण्यात आली असून स्वच्छेतेसाठी महापालिकेला सहकार करण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना करण्यात आले आहे, अशी माहिती मनपा आयुक्त रुद्रेश घाळी यांनी दिली. शहरामध्ये 20 ट्रैफिक सिग्नल आहेत, यामध्ये 16 नवीन सिग्नल असून 4 जूने सिग्नल आहेत. त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. परिवहन मंडळाच्या शहर बसेसमध्ये जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आगीच्या घटना रोखण्यासाठी 24 तास सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी अग्निशाम दलाच्या अधिकाऱ्यांनी केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 'माय बेळगाव ॲप'च्या माध्यमातून सेवा-सुविधांची माहिती

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm