बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतील तळघरांमधील आस्थापनांना नोटीस

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतील तळघरांमधील आस्थापनांच्या विरोधात महापालिकेने पुन्हा मोहीम सुरू केली आहे. शुक्रवारी किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली व खडेबाजार येथील 30 तळघरमालकांना महापालिकेने नोटीस बजावली आहे. आस्थापने हटवून तळघरे पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याचा आदेश तळघरमालकांना दिला आहे. अन्यथा कारवाईचा इशाराही दिला आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील मुख्य बाजारपेठेतील तळघरमालकांना नोटीस दिली जाईल. त्यानंतर संपूर्ण शहरातील तळघरांना नोटीस दिली जाईल, अशी माहिती मिळाली.
शुक्रवारी महापालिकेच्या बांधकाम व महसूल विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. आस्थापने हटवून पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासक नीतेश पाटील आग्रही आहेत. त्यांनी त्याबाबतची सूचना महापालिका आयुक्तांना दिलीयं.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतील तळघरांमधील आस्थापनांना नोटीस

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm