बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या गणपत गल्ली, मारूती गल्ली परिसरातील व्यापारी दुकान गाळ्यांना विक्रमी बोली

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : महापालिकेच्या व्यापारी संकुलातील दुकान गाळ्यांच्या भाडे तत्त्वावरील लिलावाला प्रारंभ झाला. या गाळ्यांना विक्रमी बोली लागली आहे. तब्बल ₹ 38000 मासिक भाडे इतकी बोली लागली. त्यामुळे महापालिकेला चांगला महसूल मिळणार आहे. महापालिकेने संकुलातील 268 गाळ्यांच्या लिलावासाठी 18 मे पर्यंत प्रक्रिया सुरू केली आहे. गणपत गल्ली, मारूती गल्ली परिसरातील व्यापारी 9 गाळ्यांसाठी लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली.
लिलावात सहभागी होण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची अनामत रक्कम होती. तर किमान भाडे मासिक 8000 रुपये होते. या लिलावाला चांगला प्रतिसाद लाभला. तब्बल 20000, 38000 रूपयांना गाळे लिलावात देण्यात आले. 9 पैकी 7 गाळ्यांचा लिलाव झाला. 2 गाळ्यांबाबत न्यायालयात दावा असल्याचे सांगून व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे त्याबाबत अभ्यास करून पुढील काळात निर्णय घेण्यात येणार आहे. त्यासाठी त्यावर लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली नाही. सोमवारी पुढील लिलाव होणार आहे. महसूल उपायुक्त प्रकाश हनगुंदी, कायदा सल्लागार अँड. उमेश महांतशेट्टी, संतोष आनिशेट्टर, फारूख यड्रावी, शिवा जाधव आदींच्या उपस्थितीत लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या गणपत गल्ली, मारूती गल्ली परिसरातील व्यापारी दुकान गाळ्यांना विक्रमी बोली

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm