Belgaum-DC-Dr-SB-Bommanalli.jpg | बेळगांव जिल्ह्यात कोरोनाचे शतक पार; एकाच दिवशी आढळले आणखी 22 कोरोना पाॅझाटिव्ह; पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 107 | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगांव जिल्ह्यात कोरोनाचे शतक पार; एकाच दिवशी आढळले आणखी 22 कोरोना पाॅझाटिव्ह; पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 107

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगांवातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. ऑरेंज झोन बेळगांव जिल्ह्यात 10 मे रोजी 22 जणांना कोरोनाची (CoVID-19) लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 107 झाली आहे. जिल्ह्यात एका कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला आहे. तर 36 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त (डिस्चार्ज) झालेले आहेत.
बेळगांव जिल्ह्यातील भागांमध्ये आज आढळलेले एकुण कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus

Area Total
निपाणी 22

टीप : हे 22 निपाणी येथील नसले तरी त्यांना निपाणी येथील मोरारजी देसाई इमारतीमध्ये क्वारंटाइन केलेले होते. हे 22 जण बेळगांव जिल्ह्यातील बेळगांव, हुक्केरी, रायबाग, चिकोडी व अथनी तालुक्यातील आहेत.
Corona-Virus-Belgaum-CoVID-19-Virus-Positive-Report-10th-May-1-20200510.jpg | बेळगांव जिल्ह्यात कोरोनाचे शतक पार; एकाच दिवशी आढळले आणखी 22 कोरोना पाॅझाटिव्ह; पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 107 | belgaum news | belgavkar बेळगावकर
राजस्थान येथील अजमेर दर्गामध्ये झालेल्या कार्यक्रमात 38 जणांनी सहभाग घेतला होता. लाॅकडाऊनमुळे ते अजमेरला अडकले होते. गेल्या दीड महिन्यापासून ते राजस्थान अजमेर येथेच होते. त्यानंतर ते अजमेरवरुन बेळगांवाला येत असताना निपाणी पोलिसांनी 2 मे रोजी सर्वांना पकडुन क्वारंटाईन केले. 38 जणांपैकी बेळगांव जिल्ह्यातील 30 व बागलकोट जिल्ह्यातील 8 जणांचा समावेश आहे. 7 मे रोजी एकुण 38 जणांचे स्वॅब सँपल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 30 जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत : बेळगांव जिल्हाधिकारी डाँ. एस. बी. बोम्मनहळ्ळी
बेळगांव जिल्ह्यातील बेळगांव, हुक्केरी, रायबाग, चिकोडी व अथनी तालुक्यातील 30 जण अजमेर मधुन आलेले - त्यातील 22 जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. तसेच बागलकोट जिल्ह्यातील 8 जणांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज एकुण 30 पाॅझिटिव्ह रुग्णांना बेळगांव जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये ठेवण्यात येणार आहे.
Corona-Virus-Belgaum-CoVID-19-Virus-Positive-Report-10th-May-02-20200510.jpg | बेळगांव जिल्ह्यात कोरोनाचे शतक पार; एकाच दिवशी आढळले आणखी 22 कोरोना पाॅझाटिव्ह; पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 107 | belgaum news | belgavkar बेळगावकर
बेळगांवकरांनी घाबरून न जाता शांतता ठेवावी. त्या 30 जणांना पहिलाच क्वारंटाइन करण्यात आले आहे.
बेळगाव पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्या सर्व 38 जणांना बेळगाव जिल्ह्याच्या सीमेमध्ये येत असतानाचा पकडून इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन केले होते. त्यामुळे ते 30 पाॅझिटिव्ह बेळगाव जिल्ह्यात कोणाच्याही संपर्कात आलेले नाहीत. त्यामुळे बेळगांवकरांनी घाबरून न जाता शांतता ठेवावी असे आवाहन बेळगावच्या जिल्हाधिकार्यांनी केले आहे.
बेळगांव व बागलकोट जिल्ह्यातील अनेक भागातील 38 जणांना क्वारंटाइन
Area Total
कोतवाल गल्ली बेळगांव शहर 2
मुलगे गल्ली निपाणी 2
हुक्केरी संकेश्वर 3
संकेश्वर 4
गोटुर 4
हुक्केरी 5
कागवाड 4
रायबाग 3
गुर्लापूर ता. मूगलगी 2
केरुर ता. बागलकोट 3
नवनगर ता. बागलकोट 5
बेलगी ता. बागलकोट 1
कर्नाटकात 53 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
10 मे रोजी कर्नाटकात coronavirus कोरोनाग्रस्तांची संख्या 847 झाली आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आज राज्यात एकूण 45 कोरोनाबाधित रुग्ण सापडले.
Area Total
बेळगांव 22
बागलकोट 8
शिमोगा 8
उत्तर कन्नड 7
बेंगळूर अर्बन 3
कलबुर्गी 3
चिक्कबळ्ळापूर 1
दावणगिरी 1

आतापर्यंत राज्यात 405 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत तर 31 जणांचा मृत्यू झाला आहे.