बेळगाव : त्या महिलेला मिळाला मदतीचा हात

बेळगाव : त्या महिलेला मिळाला मदतीचा हात

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : जुना गुडशेड रोड, गोडसे कॉलनी येथील वन टच फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे मोहनगा दड्डी (ता. हुक्केरी) येथील गरीब हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या एका महिलेला तीन महिने पुरेल इतक्या जीवनावश्यक साहित्याची मदत करण्यात आली. याबाबतची माहिती अशी की, वन टच फाऊंडेशनचे सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील यांना अलिकडेच मोहनगा दड्डी येथील सामाजिक कार्यकर्त्यां सेंथिया फर्नांडिस यांचा फोन आला.
त्यांनी गावातील सलमा हयातखान नामक मुस्लीम महिला अतिशय गरीब परिस्थितीत राहतेय. तिचा नाही. दोन लहान मुले असलेल्या सलमाकडे रेशन कार्ड अथवा आधार कार्ड नाही. स्वतःचे घरही नसल्यामुळे तिला मदतीची गरज असल्याचे सांगितले. तेंव्हा विठ्ठल पाटील यांनी त्वरित मदतीचा हात पुढे केला. वन टच फाऊंडेशनच्या महिला सदस्या सुप्रिता शेट्टी, वैशाली मोरे, माधुरी माळी, कु. वैष्णवी भातकांडे, कल्पना सावगावकर, वैशाली पाटील, धनश्री पाटील, या सर्वांनी त्या कुटुंबाला तीन महिने पुरेल इतके, 50 किलो तांदूळ, तेल पाकिटे, साखर,चहा पावडर , पोहे, तिखट पाकीट, हळद पाकीट, मीठ, कांदे, तुरडाळ ,चनीडाळ, मूग, मटार, हरभरा,मसूर, बिस्किट पाकीट, साबण, व्हील पावडर, एक चादर आदी जीवनावश्यक साहित्य स्वतः जमा केले.
सदर सर्व साहित्य फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील आणि कल्पना सावगावकर यांनी बेळगावपासून सुमारे 50 कि. मी. अंतरावरील दड्डी येथे जाऊन समक्ष भेटून सलमा हयातखान यांच्याकडे ती मदत सुपूर्द केली. सदर मदतीमुळे भावनाविवश झालेल्या सलमा यांनी कृतज्ञता व्यक्त करून विठ्ठल फोंडू पाटील यांचे आभार मानले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : त्या महिलेला मिळाला मदतीचा हात

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm