काय सांगता...! नोकरी सोडून इंजिनिअर चक्क विकतोय व्हेज बिर्याणी;

काय सांगता...!
नोकरी सोडून इंजिनिअर चक्क विकतोय व्हेज बिर्याणी;

belgavkar.com | belgaum | belgavkar

पगारापेक्षा अधिक होतेय कमाई

नोकरीतून समाधान मिळत नसल्याने त्यांनी 9 ते 5 या पारंपरिक वेळेची नोकरी सोडण्याचा आणि व्यवसाय (Business) सुरू करण्याचा निर्णय घेतला. नोकरीपेक्षा (Job) व्यवसाय करणं जास्त फायदेशीर ठरतं, असं काही लोकांचं मत असतं. व्यवसायात जोखीम असली तरी मिळणारा नफाही (Profit) मोठा असू शकतो. त्यामुळे काही जण शिक्षण घेऊन नोकरी करण्याऐवजी व्यवसायाला प्राधान्य देतात. काही जण नोकरीत मन न रमल्यानं किंवा अधिक पैसा कमवण्याच्या महत्वाकांक्षेमुळे नोकरी सोडून व्यवसायात उतरतात आणि यशस्वीदेखील होतात. हरियाणातल्या दोन इंजिनीअर युवकांची कहाणी काहीशी अशीच आहे. या तरुणांनी मोठ्या कष्टानं इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. नोकरी मिळवली. पण नोकरीतून समाधान मिळत नसल्याने त्यांनी 9 ते 5 या पारंपरिक वेळेची नोकरी सोडण्याचा आणि व्यवसाय (Business) सुरू करण्याचा निर्णय घेतला.
सोशल मीडियावर (Social Media) आपण इंजिनीअर विद्यार्थ्यांच्या बाबतीत अनेक मीम्स (Memes) पाहतो. या मीम्समध्ये या विद्यार्थ्यांची खिल्ली उडवलेली असते. पण या दोन तरुणांनी व्यवसायात यशस्वी होत याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. हे तरुण रस्त्यावर स्टॉल टाकून व्हेज बिर्याणीची (Veg Biryani) विक्री करत आहेत. विशेष म्हणजे या बिर्याणीची चव खवय्यांच्या पसंतीस उतरत असल्याचे चित्र आहे. हरियाणामधल्या दोन इंजिनीअर तरुणांचा व्यावसायिक प्रवास अन्य तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. हरियाणातल्या सोनीपत येथील रोहित आणि सचिन या दोन तरुणांनी चार ते पाच वर्षं कठोर मेहनत करत आपलं इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र आता या दोघांनी नोकरी सोडून देत `इंजिनीअर्स व्हेज बिर्याणी` (Engineers Veg Biryani) नावाचा छोटासा स्टॉल सुरु केला आहे. हे दोघं शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करत होते. पण मिळणाऱ्या पगारात समाधानी नसल्याने त्यांनी नोकरी सोडून व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. रोहित पॉलिटेक्निकचा विद्यार्थी होता तर सचिनने बी. टेक केलं आहे. नोकरीऐवजी व्यवसायातून पैसा कमवण्याचा या दोघांनी निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सोनीपत मधल्या उच्चभ्रु वस्तीत `इंजिनीअर्स व्हेज बिर्याणी` नावाचा स्टॉल सुरु केला. या स्टॉलवर ऑईल फ्री बिर्याणी मिळते. हाफ प्लेट बिर्याणीची किंमत 50 रुपये तर फुल प्लेटची किंमत 70 रुपये आहे. ही बिर्याणी अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे अर्थातच या दोघांचा व्यवसाय वाढला असून, नोकरीच्या तुलनेत अधिक पैसा या व्यवसायातून मिळत आहे.
लोकांचा वाढता प्रतिसाद बघता व्यवसायाचा विस्तार करण्याचा सचिन आणि रोहितचा मानस आहे. ``आमच्या स्टॉलवरची बिर्याणी ग्राहकांना खूप आवडते, त्यामुळे प्रतिसाद वाढला असून, आमचा नफाही वाढला आहे,`` असा दावा रोहित आणि सचिनने केला आहे. नोकरी सोडून व्यवसायात उतरण्याचं आणि तो यशस्वी करण्याचं रोहित आणि सचिन या तरुणांचं धाडस युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारं आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

काय सांगता...! नोकरी सोडून इंजिनिअर चक्क विकतोय व्हेज बिर्याणी;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm