belgavkar - बेळगावकर - belgavkar.com - belgaum

कर्नाटकमध्ये रुग्णसंख्या वाढूनही सप्ताहअखेरची जमावबंदी मागे

belgavkar.com | belgaum | belgavkar

वीकेंड कर्फ्यू अखेर मागे

कर्नाटक : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असतानाही कर्नाटक सरकारने साप्ताहिक सुटीच्या दिवशी जमावबंदीचा (Weekend Curfew) निर्णय मागे घेतला आहे. रात्रीच्या जमावबंदीचा (Night Curfew) नियम मात्र कायम असणार असल्याचे कर्नाटक सरकारने सांगितले. मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी शुक्रवारी मंत्रिमंडळ, अधिकारी आणि तज्ज्ञांशी चर्चा करून हे निर्णय घेतले. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तांत्रिक सल्लागार समितीने केलेल्या शिफारशीवरुन राज्य सरकारने कोरोनासंदर्भात शुक्रवारी सुधारित मार्गदर्शक सूची जारी केली आहे. त्यानुसार राज्यातील विकेंड कर्फ्यू (शनिवार, रविवारची संचार बंदी) मागे घेण्यात आला आहे.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
मार्गदर्शक सूची पुढीलप्रमाणे


- दर शुक्रवारी रात्री 10 ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत लागू केला जाणारा वीकेंड कर्फ्यू मागे घेण्यात आला आहे. पूर्वीच्या आदेशानुसार नाईट कर्फ्यू मात्र दररोज रात्री 10 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजेपर्यंत लागू राहील.- इतर निर्बंध आणि आदेश पूर्वीप्रमाणेच राहतील- मेळावे, धरणे, सभा -परिषदा, सामाजिक -धार्मिक -राजकीय आंदोलन, कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका आदींवर बंदी असेल. तथापि लग्न समारंभांना खुल्या जागेत 200 पेक्षा अधिक आणि बंदिस्त जागेत 100 पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती राहू नये, या अटीवर परवानगी असेल.- पब्स, क्लब, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स आदी 50 टक्के आसन क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र त्यासाठी पूर्ण लसीकरण झालेल्यांना प्रवेश दिला जावा. 
bjp-dhananjay-jadhav
कर्नाटकमध्ये रात्री 10 ते पहाटे 5 पर्यंत जमावबंदीचा आदेश आहे. त्याशिवाय चित्रपटगृहे, पब, क्लब, उपाहारगृहे, बार, हॉटेल या ठिकाणी 50 टक्के उपस्थितीचा नियम करण्यात आला आहे. हे नियम कायम असतील, असे कर्नाटक सरकारकडून सांगण्यात आले. साप्ताहिक सुटीच्या म्हणजेच शनिवार, रविवारी जमावबंदी करण्याची सध्या गरज नाही. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचा दर केवळ 5 टक्के आहे. हा दर अधिक प्रमाणात वाढला तर साप्ताहिक सुटीच्या दिवशी जमावबंदीचा निर्णय पुन्हा घेण्यात येईल, असे महसूलमंत्री आर. अशोक यांनी सांगितले.