छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात उंच मूर्ती, कोल्हेंनी शेअर केली माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात उंच मूर्ती, कोल्हेंनी शेअर केली माहिती

belgavkar.com | belgaum | belgavkar

जगात प्रथमच महाराजांची मूर्ती इतक्या उंचावर बसविण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे हे सध्या वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. नुथराम गोडसेची भूमिका साकारलेला त्यांचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. कोल्हेंच्या या चित्रपटाचा वाद सध्या सोशल मीडियावर रंगला आहे. याबाबत, कोल्हेंनी अनेकदा स्पष्टीकरणही दिलं आहे. आता, त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जगातील सर्वात उंच मूर्तीची चांगली माहिती शेअर केली आहे.
the-worlds-tallest-statue-of-shivaji-maharaj-shared-by-dr-amol-kolhe-jammu.jpg | छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात उंच मूर्ती, कोल्हेंनी शेअर केली माहिती | belgaum news | belgavkar बेळगावकर
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आजही तमाम भारतीयांचे प्रेरणास्रोत व आदर्श आहेत. देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ 14 हजार 800 फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मुर्ती स्थापित केली आहे. जगात प्रथमच महाराजांची मूर्ती इतक्या उंचावर बसविण्यात आला आहे. महाराजांचा मूर्ती पुण्यातील 25 वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारला आहे. मच्छल बटालियनचे कर्नल प्रणव पवार यांनी सदर मच्छल या ठिकाणी स्थापित केला आहे.
देशासाठी सीमेवर लढणाऱ्या तमाम जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सदैव प्रेरणादायी ठरेल. सर्व जवानांना माझा सलाम! जय शिवराय! असे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. हुतात्मा जवानांच्या स्मरणार्थ मराठा लाईट इन्फॅन्ट्रीच्या 56 राष्ट्रीय रायफलच्या जवानांनी या स्मृतीस्थळाची निर्मिती केली आहे. या समृतीस्थळात एक भिंत उभारण्यात आली आहे. देशासाठी कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या 32 जवानांची नावे त्या भिंतीवर कोरण्यात आली आहेत. यामुळे देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांचा इतिहास कायम सर्वसामान्यांपर्यंत पोहचत राहील, असेही कर्नल पवार यांनी सांगितले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात उंच मूर्ती, कोल्हेंनी शेअर केली माहिती
जगात प्रथमच महाराजांची मूर्ती इतक्या उंचावर बसविण्यात आली आहे.

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm