लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी शक्कल...!
;
एकाच मोबाईल क्रमांकवरून करा 6 सदस्यांची नोंदणी

belgavkar.com | belgaum | belgavkar

CoWin Portal वर आता 4 ऐवजी 6 सदस्यांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. एकाच मोबाईल क्रमांकावरुन 6 सदस्यांची नोंद करता येणार आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारताने रेकॉर्ड ब्रेक लसीकरण मोहिम राबविली. त्याचा परिणाम ही दिसून आला. प्रतिकार क्षमता वाढल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाला काही प्रमाणात अटकाव करण्यात यश आले आहे. कोरोना विरुद्धची ही लढाई अधिक प्रखर करण्यासाठी सरकारने पाऊले उचलली असून लसीकरणात येणार्‍या तांत्रिक अडचणींचा निपटारा करण्याचा धडका आरोग्य मंत्रालयाने लावला आहे.
दुर्गम भागापासून ते दर्‍या खोर्‍यात राहणार्‍यांना लस द्यावी यासाठी प्रयत्न सुरु आहे. आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने, एकाच मोबाईल क्रमांकावरुन 6 सदस्यांना को-विन पोर्टलवर (CoWin Portal) नोंदणीची परवानगी दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा 4 सदस्यांपुरती मर्यादीत होती. मात्र ग्रामीण भागातील मोठ्या कुटुंबात केवळ एकाच मोबाईलचा वापर होतो. 4 सदस्यांची पूर्वीची मर्यादा अशा कुटुंबांसाठी अडचणी ठरत होती. सरकारने याविषयीचा बदल केला आहे.
लाभार्थ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी को-विन पोर्टलवरच्या सेवा अद्ययावत करण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एकाच मोबाईल क्रमांकावरुन 6 सदस्यांची नोंदणी सुलभ करण्यासाठी Cowin पोर्टल अद्ययावत करण्यात आले आहे. यापूर्वी एका मोबाईल क्रमांकावरुन 4 सदस्यांची नोंदणी करता येत होती. त्यात आता आणखी दोन सदस्यांची अधिकची नोंदणी करता येणार आहे. एकूण 6 सदस्यांची नोंदणी करता येणार आहे. सदस्याला Cowinने आणखी काही सुविधा सुलभ केल्या आहेत. त्यानुसार, तुम्ही लसीचा एक डोस घेतला असेल अथवा दोन डोस घेतले असेल तर त्याविषयीची सद्यस्थिती (Status) सदस्य बदलू शकतो. त्यासंबंधीची योग्य माहिती मात्र त्याला द्यावी लागेल. मोबाईल क्रमांकाआधारे सत्यापन करुन ती माहिती अद्ययावत होईल. मध्यंतरी पोर्टलवर अनेक तांत्रिक गडबडी झाल्या आहेत. त्यामुळे तुमची लस घेतल्याची तारीख, नाव, पत्ता आणि इतर माहितीत बदल झाला असेल तर त्या सदस्याला मोबाईल क्रमांक सत्यापन करुन बदलविता येईल. त्याची मुभा आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यासाठी रेज अ इश्यू युटिलीटी या पर्यायचा वापर करता येईल. याठिकाणी संबंधित बदल सूचीत करुन 3 ते 7 दिवसांत लाभार्थ्याची माहिती अद्ययावत (Update) करता येते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी शक्कल...!; एकाच मोबाईल क्रमांकवरून करा 6 सदस्यांची नोंदणी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm