बेळगाव : ऑनलाईन फसवणूक;
तरुणाला घातला लाखाचा गंडा

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत. पोलीस दलाच्यावतीने वारंवार जागृतीसाठी प्रयत्न करूनही फशी पडणार्‍या नागरिकांची संख्या मात्र काही कमी झाली नाही. एका तरुणाच्या खात्यातून भामट्यांनी 99 हजार 444 रुपये गायब केले आहेत. शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून याप्रकरणी संबंधित तरुणाने सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली आहे.
पोलिसांत तक्रार केल्यानंतरही फसवणूक करणार्‍या भामट्याचे फोन कॉल सुरूच होते. याप्रकरणी अनंत चौगुले या तरुणाने सायबर क्राईम विभागाकडे तक्रार केली आहे. उपलब्ध माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनंत यांचे खाते आहे. ऑनलाईन व्यवहारासाठी असणारे App व्यवस्थित कार्यरत झाले नाही म्हणून अनंत यांनी बँकेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी तेथील कर्मचार्‍यांनी गुगलवरून मोबाईल क्रमांक सर्च करा व चौकशी करा, असा सल्ला दिला. गुगलवर सर्च केल्यानंतर कस्टमर केअर क्रमांक म्हणून 18004124887 हा क्रमांक मिळाला. त्यावेळी अनंत यांनी या क्रमांकावर संपर्क साधून संबंधितांना आपली समस्या सांगितली. त्यावेळी पलिकडच्या व्यक्तीने थोडावेळ थांबा, आमचे साहेब तुमच्याशी स्वतः संपर्क साधतात. त्यांच्याकडे तुमची समस्या सांगा, असा निरोप देण्यात आला.
या निरोपामुळे अनंत हे साहेबांच्या फोन कॉलच्या प्रतीक्षेत होते. सिनिअर ब्रॅंच मॅनेजरशी संपर्क साधा, असे सांगून 9832046370 हा क्रमांक देण्यात आला. व्यवहार करताना येणार्‍या अडचणी सोडविण्यासाठी अनंत यांनी त्या क्रमांकावर संपर्क साधला. अखेर Any Desk App डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. अनंत यांनी भामट्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून ते अ‍ॅप डाऊनलोड केले. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर भामटे सांगतील तसे हा तरुण ऐकत गेला. अ‍ॅपवरून ओटीपी पाठविण्यात आला. त्यावेळी क्षणार्धात 99 हजार 444 रुपये भामट्यांनी हडप केले. आपल्या बँक खात्यातील मोठी रक्कम भामट्यांनी हडप केल्याचे लक्षात येताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांची भेट घेऊन तक्रार केली.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : ऑनलाईन फसवणूक; तरुणाला घातला लाखाचा गंडा

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm