बेळगाव : मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी अनुदान देण्यासाठी 5 टक्के लाच मागितल्याप्रकरणी बेळगाव 'मुझराई' (इंडोवमेंट) विभागाच्या अधिकाऱ्यासह त्याच्या नातेवाइक हस्तकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (Anti Corruption Bureau (ACB) - एसीबी) शुक्रवारी रात्री अटक केली. मुझराई विभागाचे तहसीलदार दशरथ नकुल जाधव आणि त्यांचा नातेवाईक संतोष कडोलकर यांना अटक झाली आहे.
belgavkar - बेळगावकर - belgavkar.com
रामदुर्ग येथील एका मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ₹ 4 लाख रुपये मंजुरी दिली होती. अनुदान वाटपासाठी नकुल जाधव यांनी ₹ 20000 रुपयांची मागणी केली होती. मंदिराचे सुभाष गुडके यांनी एसीबीकडे लाचखोरीची तक्रार केली होती. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सहकाऱ्याच्यांवतीने लाच स्वीकारणाऱ्या नातेवाईकाला अटक केली आहे. याच प्रकरणात अधिकारी जाधव यांनाही ताब्यात घेण्यात आले. एसीबीचे एसपी बी. एस. न्यामगौडर, डीवायएसपी करुणाकर शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अडिवेश गडिगोप्पा, सुनीलकुमार आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

- काश्मीरच्या बारामुल्ला भागात 3 पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान
- 'वंदे मातरम्'ला राष्ट्रगीतासमान दर्जा मिळावा...!
- आरारारा.... खतरनाक...! अख्ख्या शाळेत दोन तरुणांनी पेंट करून लिहिलं ‘Sorry’; पोलिसांकडून शोध सुरू - कर्नाटक
- दाऊद दरमहा 'खास लोकांना' प्रत्येकी 10 लाख रुपये पाठवायचा, ईडीच्या तपासात नवा खुलासा