बेळगाव : 106 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित 106 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांची प्रकृती व्यवस्थित असून, त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याचे पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वच पोलिसांची आरटीपीसीआर तपासणी करून घेणे सुरू आहे. पहिल्या दिवशी 11, दुसऱ्या दिवशी 40 तर आता कोरोना पॉझिटीव्ह झालेल्या पोलिसांची संख्या 106 इतकी झाली आहे.
एकूण 1400 अधिकारी व पोलिसांपैकी आतापर्यंत सुमारे एक हजार पोलिसांची तपासणी केली आहे. यामध्ये पॉझिटिव्ह सापडलेल्या पोलिसांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. यापैकी बऱ्याच जणांमध्ये लक्षणेदेखील नाहीत परंतु, अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एखाद्यामध्ये गंभीर लक्षणे आढळून आल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची सूचनाही दिलेली आहे, असेही आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यात (21 जानेवारी 2022) आरोग्य विभागाच्या मीडिया बुलेटिनमध्ये 518 कोरोना पाॅझिटिव्ह (CoronaVirus) रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यात नाईट कर्फ्यू रात्री 10 ते सकाळी 5 यावेळेत लागू करण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील नाईट कर्फ्यू हटविण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 'या' भागामध्ये आढळले कोरोना पॉझिटिव्ह Coronavirus
तालुका कोरोनाबाधित
बेळगाव शहर व तालुका 298
गोकाक आणि मुडलगी तालुका 40
चिकोडी आणि निपाणी तालुका 32
हुक्केरी तालुका 31
खानापूर तालुका 30
बैंलहोंगल तालुका 23
रामदूर्ग तालुका 18
अथणी तालुका 17
सौंदत्ती तालुका 16
रायबाग तालुका 13

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 106 पोलिस कोरोना पॉझिटिव्ह

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm