बेळगाव : तरुणाचा खून... चौघांची निर्दोष मुक्तता

बेळगाव : तरुणाचा खून... चौघांची निर्दोष मुक्तता

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मुचंडी (ता. बेळगाव) येथील एका युवकाचा पैशांच्या देवाण-घेवाणीवरून खून केल्याच्या आरोपाखाली चौघांची अकरावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. उमेश ऊर्फ पप्पू बाळू कुऱ्याळकर (वय 30, रा. राजहंस गल्ली, अनगोळ), शाम परशराम गौंदांडकर (वय 30, रा. अनगोळ मुख्य रोड, गाडगीळ बस स्थानकानजीक), परशराम भरमा पाखरे (वय 36, रा. लक्ष्मी गल्ली हनुमान मंदिरनजिक, मुचंडी), राहुल सिद्धप्पा अवाणाचे (वय 25, रा. संभाजी गल्ली, मुचंडी) अशी निर्दोश मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, 24 जुलै 2020 रोजी फिर्यादीचा मुलगा महेश महादेव अवनी (वय 27) रात्री 8 च्या सुमारास घरातून बाहेर गेला.
रात्री दहा वाजता त्याला फिर्यादीचा जावई प्रकाश पाटील व संशयीत आरोपी परशराम पाखरे यांनी रक्तबंबाळ अवस्थेत त्याला घरी आणले. वाहनाच्या अपघातात तो जखमी झाला असल्याचे त्यांनी सांगितले. महेशवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मारिहाळ पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंदविला पण त्याचा तपास करत असताना महेशचा पैशाच्या देवाण-घेवाणीमध्ये खून झाल्याचे समोर आले. मुतगा-मुंचंडी रोडवर अनोळखी वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची नोंद मारिहाळ पोलीस ठाण्यात देखील करण्यात आली. चारही आरोपींनी अनगोळ येथील शेतात महेशला मारहाण केली. यातून त्याचा मृत्यू झाला असे उघडकीस आल्यानंतर टिळकवाडी पोलिसांत खटला वर्ग करण्यात आला. पोलिसांनी चारही संशयितांना अटक करून दोषारोप दाखल केले.
सुनावणीत 25 साक्षीदार, दोन मुद्देमाल, 63 कागदपत्र तपासण्यात आले. साक्षीदारातील विसंगतीमुळे न्यायाधीश गुरुराज शिरोळ यांनी चौघांची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने अ‍ॅड. शामसुंदर पत्तार, अ‍ॅड. हेमराज बेंचण्णावर, अ‍ॅड. शंकर बाळा नाईक, अ‍ॅड. मारुती कामानाचे यांनी काम पाहिले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : तरुणाचा खून... चौघांची निर्दोष मुक्तता

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm