बेळगाव : राजद्रोहाचा गुन्हा;
पोलिसांच्या अंगलट आल्याने कलम माघारी घेतले

belgavkar.com | belgaum | belgavkar

राजद्रोहाच्या (124 A) गुन्ह्यांसह इतर गुन्हे दाखल

बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाल्यानंतर बेळगावात त्याचे पडसाद उमटले होते.

बेळगाव : राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बेळगावातील तरुणांना अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. धारवाड येथील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, अंकुश केसरकर यांना जामीन मंजूर केला असून ॲड. अमर येळूरकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याशिवाय बेळगाव येथील आठव्या अतिरिक्त जिल्हा सत्र  न्यायालयाने राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 38 जणांना जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर आता अंगलट आल्याने 61 जणांवर दाखल केलेले राजद्रोहाचे कलम पोलिसांनी माघार घेतली आहे.
आधी मार्केट पोलिसांनी तर शुक्रवारी खडेबाजार पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल करताना 61 जणांवरील राजद्रोहाचे कलम मागे घेतले. बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली. त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या मराठी नेते आणि युवकांवर दगडफेकीचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर राजद्रोहाचा गुन्हा घालण्यात आला. केवळ मराठी जनतेला त्रास देण्यासाठी पोलिसांनीही हे कलम घातले होते; पण याविरोधात राज्यपातळीवर आवाज उठवल्यामुळे आणि मानवाधिकार आयोगाकडे धाव घेण्यात येणार असल्यामुळे राजद्रोहाचे प्रकरण अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे मार्केट पोलिसांनी हे कलम मागे घेतल्यानंतर आता खडेबाजार पोलिसांनीही कलम मागे घेत असल्याचे नमूद करून दोषारोपपत्र सरकारी वकिलांकडे दिले आहे.
मराठी भाषिक तरुणांवर राजद्रोहसारखे गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी तयार केलेल्या यादीतील 61 जणांपैकी 38 जणांना अटक केली आहे. उर्वरित 23 जण भूमिगत झाले आहेत. अशाप्रकारे त्रास देण्यासाठी त्या युवकांवर गुन्हे घातले जात आहेत.


श्रीराम सेना हिंदुस्थानाचे प्रमुख रमाकांत कोंडुसकर
युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके
युवा समितीचे उपाध्यक्ष अंकुश केसरकर,
श्रीराम सेना हिंदुस्थानाचे नरेश निलजकर
मेघराज गुरव
विनायक सुतार
सुनील लोहार
नागेश काशीकर
रोहित माळवी
विनायक स. सुतार
गजानन जाधव
विनायक कोकितकर
दयानंद बडस्कर
सुरज गायकवाड,
राहुल भराते
महेश मुतगेकर
राहुल सावंत
सिद्धू उर्फ श्रीधर गेंजी
गणेश येळ्ळूरकर
विकी मंडोळकर
सुरज शिंदोळकर
भालचंद्र बडस्कर
विनायक धुळजी
राज गुरव
हरीश मुतगेकर
लोकनाथ रजपुत
राजेंद्र बैलूर (रा. भोज गल्ली, शहापूर)
अभिषेक पुजारी (रा. भोज गल्ली, शहापूर)
बळवंत शिंदोळकर (रा . कोनवाळ गल्ली)
भागेश नंद्याळकर
भरत मेनसे अशी अटक करण्यात आलेल्याची नावे असून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात झालीयं.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : राजद्रोहाचा गुन्हा; पोलिसांच्या अंगलट आल्याने कलम माघारी घेतले
राजद्रोहाच्या (124 A) गुन्ह्यांसह इतर गुन्हे दाखल

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm