सीमेवर कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध;S

सीमेवर कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध;
S

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांच्यावर भ्याड हल्ला आणि शाई फेकीच्या निषेधार्थ कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध शिनोळी (चंदगड) येथे कर्नाटक सीमेवर आज दुपारी शिवसेना व युवासेना पदाकारी व मित्रपक्ष आणि शिवसैनिक, युवासैनिक, ग्रामस्थांच्यावतीने घोषणा देऊन करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रभाकर खांडेकर म्हणाले, दिपक दळवी साहेबांनी आजपर्यंत माय मराठी हक्कासाठी आपली बाजु मांडत आली. हल्लेखोरांवर त्वरीत कारवाई जर झाली नाही तर याचे परिणाम वाईट होतील असा इशारा दिला.
महाराष्ट्र मध्यवर्ती एकीकरण समितीचे बेळगाव शहर अध्यक्ष दीपक दळवी त्यांच्यावर शाई फेक करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी आयोजित केलेल्या बेळगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंगळवारी सकाळपासूनच बेळगावसह उपनगर, सीमाभागातील व्यवहार कडकडीत बंद होते. बेळगाव शहरातील अनेक मंडळांनी फलकावर बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
बेळगावातील मराठी भाषकांचा संताप आज सकाळपासूनच दिसून आला. बेळगाव शहरातील व्यवहार सकाळपासून ठप्प होते. उपनगरातीलही व्यवहार कडकडीत बंद होते. संपूर्ण सीमाभागात बंदला उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. विक्रेते, दुकानदारांनी आपल्या बंद दरवाजावर दळवी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदवत आज व्यवसाय बंद राहणार असल्याच्या पाट्या चिकटवल्या आहेत. शहरातील मराठी भाषक तरुण मंडळांच्या फलकावर या घटनेचा निषेध नोंदवत आजच्या बंदमध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या घटनेची दखल घेऊन बेळगाव शहरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

सीमेवर कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध;S

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm