bapat-galli-belgaum-majat-shed-issue-belgaum-bapat-galli-belgaum-बापट-गल्ली-बेळगाव-belgaum.jpg | बेळगाव : बापट गल्लीत शेड उभारण्यावरून वाद; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : बापट गल्लीत शेड उभारण्यावरून वाद;

belgavkar.com | belgaum | belgavkar

काहीकाळ दुकाने बंद; हिंदू संघटनांच्या विरोधानंतर तोडगा

बेळगाव : बेळगाव शहरातील बापट गल्ली येथे शेड उभारल्यावरून दोन गटांत वादावादीचा प्रसंग घडला. या घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद ठेवली. खडेबाजार पोलीस स्थानकाबाहेरही स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. बुधवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास बापट गल्ली येथील एका मुस्लिम समाजाच्या मजारवर शेड उभारण्यावरून वादावादीचा प्रसंग घडला. परिसरात तणावाची स्थिती निर्माण होताच स्थानिक नागरिकांनी आपली दुकाने बंद केली.
पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्या उपस्थितीत सायंकाळी नागरिकांची बैठक झाली. या बैठकीत बापट गल्ली येथील समस्या काय आहे? यावर चर्चा केली. यावेळी बेळगावातील हिंदू संघटनांचे 100-200 कार्यकर्ते जमल्यानंतर स्थानिक प्रमुखांच्या उपस्थितीत तोडगा काढण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.