मोठी बातमी! ओमीक्रॉन अखेर भारतात पोहोचला;
कर्नाटकात 2 रुग्ण सापडले

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटकमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेले 2 रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने बाधित

कर्नाटक - बेंगळूरु : केंद्र सरकारने आणि राज्यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटला रोखण्याचे जिकिरीचे प्रयत्न करूनही ओमीक्रॉन भारतात दाखल झाला आहे. कर्नाटकाची राजधानी बंगळूरुमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने बाधित झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 66 वर्षीय आणि 46 वर्षीय अशा दोन पुरुष प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे. 
 
या दोन्ही रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत. दोन्ही ओमीक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. देशात आणि जगभरातील अशा सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणतेही गंभीर लक्षण आढळून आलेले नाही. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की त्याच्या पुराव्यांचा अभ्यास केला जात आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे. जिनोम सिक्वेंसिंगद्वारे कर्नाटकातील दोन रुग्णांना कोरोनाच्या नव्या ओमीक्रॉन व्हेरिअंटची बाधा झाल्याचे समोर आले आहे. कर्नाटकात आलेल्या या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण 11 तारखेला तर दुसरा रुग्ण 20 नोव्हेंबरला भारतात आले होते. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता Omicron ची लागण झाल्याचंही समोर आलं आहे.
बुधवारी रात्री दोघांचे अहवाल आले, दोघांवर उपचार सुरू असून त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली होती. सध्या घाबरण्याची गरज नसली तर खबरदारी घेणं महत्त्वाचं असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. ICMR डीजी बलराम भार्गव म्हणाले की, जीनोम सिक्वेन्सिंगद्वारे कर्नाटकमध्ये आतापर्यंत ओमिक्रॉनची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. यासोबतच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं की, आतापर्यंत सुमारे 29 देशांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटची 373 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
देशात 37 लॅब आहेत. ओमीक्रॉनचे रुग्ण सापडले म्हणून लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, परंतू काळजी घेणे गरजेचे आहे, असेही अग्रवाल म्हणाले. जे रुग्ण सापडले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटविण्यात आली आहेत. त्यांनाही डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे., असे अग्रवाल यांनी म्हटले. आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमीक्रॉन सापडला आहे.
Two cases of #Omircron detected in Karnataka so far through genome sequencing effort of INSACOG consortium of 37 laboratories established by the Ministry of Health. We need not panic, but awareness is absolutely essential. COVID apt behaviour is required: Balram Bhargava, DG ICMR
— ANI (@ANI) December 2, 2021

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

मोठी बातमी! ओमीक्रॉन अखेर भारतात पोहोचला; कर्नाटकात 2 रुग्ण सापडले
कर्नाटकमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेले 2 रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने बाधित

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm