belgaum-zoo-nakula-krishna-nirupama-lion-in-zoo-bhataramanhatti-belgaum-202102.jpg | बेळगाव : धक्कादायक; एका सिंहाचा झालायं मृत्यू... | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : धक्कादायक; एका सिंहाचा झालायं मृत्यू...

belgavkar.com | belgaum | belgavkar

नकुल, कृष्ण आणि निरूपमा हे सिंह दाखल झाले होते

बेळगाव : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग 4 व बेळगाव शहरा लगत असलेल्या भुतरामहनहट्टी येथील वीर कितूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील नकुल सिंहाचा आजारामुळे मृत्यू झाला. ही घटना बुधवारी रात्री घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राणी संग्रहालयातील एका सिंहाचा आजारामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
प्रेक्षा - गणेशाच्या पोटी 12 फेब्रुवारी 2010 ला जन्मलेल्या या तिन्ही सिंहाना (दोन नर - Nakul, Krishna आणि एक मादी - Nirupama) प्राणिसंग्रहालयात पाठविण्यात आले होते. बुधवारी रात्री यातील एका सिंहाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आजारामुळे या सिंहाचा मृत्यू झाल्याचे वन खात्याचे अधिकारी सांगत असले तरी पुरेशा आहाराअभावी या सिंहाचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. वन्य प्राण्यांच्या आहारात वनाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्यानेच पुरेशा आहाराअभावी प्राण्यांना उपाशी रहावे लागत आहे. त्यामुक्षे वन्य प्राणी आजारी पडत आहेत. असाच प्रकार मृत सिंहाच्या बाबतीतही घडल्याचा आरोप प्राणीप्रेमींनी केला आहे. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, सिंहाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर वन खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राणी संग्रहालयाला भेट देऊन पाहणी केली. मृत सिंहाचे शव विच्छेदन करण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यावर सिंहाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. 34 एकर परिसरात पसरलेल्या या मिनी झू (प्राणी संग्रहालय) मध्ये अनेक प्राणी व पक्षी आहेत. परंतु वाघ व सिंह यासारख्या प्राण्यांना ठेवण्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाची गरज लागते. म्हैसूर प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर येथील राणी कित्तूर चन्नम्मा प्राणिसंग्रहालयाचा विकास होत आहे. कोरोनामुळे इतर प्राणी आणण्यासाठी विलंब झाला होता. त्यानंतर नकुल, कृष्ण आणि निरूपमा हे सिंह दाखल झाले होते. या प्राणी संग्रहालयाचा विकास करून त्याकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी वन खात्याच्यावतीने योजना जारी करण्यात आली. करोडो रुपये खर्च करून तेथे विविध वन्य प्राणी आणण्यात आले आहेत. तीनच महिन्यांपूर्वी या प्राणी संग्रहालयात एक नर व एक मादी सिंह आणण्यात आले होते. त्यापैकी नर सिंहाचा आजाराने मृत्यू झाला आहे.