maharashtra-video-of-heavy-rains-on-raigad-is-going-viral.jpeg | 'या' व्हिडीओची चर्चा; Video : दुर्गराज रायगड आणि शिवछत्रपतींची मोहक मूर्ती; रायगडवरच्या मुसळधार पावसाचा 'हा' व्हिडीओ होतोय व्हायरल | belgaum news | belgavkar बेळगावकर

'या' व्हिडीओची चर्चा; Video : दुर्गराज रायगड आणि शिवछत्रपतींची मोहक मूर्ती; रायगडवरच्या मुसळधार पावसाचा 'हा' व्हिडीओ होतोय व्हायरल

belgavkar.com | belgaum | belgavkar

रायगडचं नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो फक्त किल्लाच नव्हे तर मराठ्यांचा स्वाभिमानी, अभिमानी इतिहास आणि रयतेचा राजा... रायगड म्हणजे दुर्गदुर्गेश्वर, दुर्गराज. धुवांधार जलवर्षावात तर हा देखणा दुर्गराज पाहणे म्हणजे डोळ्याचे निव्वळ पारणे फेडण्याचा क्षण. असाच एक रायगडवरच्या पावसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड (Raigad) किल्ल्यावरील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतं आहे
रायगडमध्ये तुफान पाऊस, मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मनमोहक दृश्य कॅमेरात कैद, महाराष्ट्रातील सर्वाधिक व्हायरल होणारा व्हिडीओ #Raigad | #ShivajiMaharaj | #MaharashtraRain | #ViralVideo
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. रायगडावर देखील पावसाच्या जोरदार सरी आणि प्रचंड सोसाट्याचा वारा सुटला होता. रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करायला गेलेल्या शिवप्रेमीनं रायगडावरील ही दृश्य कॅमेरात टिपली आहेत. सध्या व्हाटसअ‌ॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. अनेकांच्या व्हाटसअ‌ॅप स्टेटसला हाच व्हिडीओ पाहयाला मिळत आहे.
व्हिडीओत नेमकं काय? : महाराष्ट्रात कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. रायगड जिल्ह्यातही पावसानं जोरदार हजेरी लावली. स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडावरील एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. प्रचंड सोसाट्याचा वारा आणि वरुन कोसळणाऱ्या पावसाच्या सरी या व्हिडीओत दिसून येत आहेत. या व्हिडीओत रायगडावरील राजसदरेवर पाऊस कैद झालेला आहे. राजसदरेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती अगदी मनमोहक दिसत आहे.
दे धक्का चित्रपटातील गीताचा वापर
छत्रपती शिवाजी महाराजांचा व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये 2008 साली प्रदर्शित झालेल्या दे धक्का चित्रपटातील वाट चालावी चालावी या गीताचा वापर करण्यात आला आहे. हे गीत सुप्रसिद्ध संगीतकार अजय- अतुल यांनी संगीतबद्ध केलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला रायगडला भेट देणार
खासदार संभाजी छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी संभाजी छत्रपती यांनी दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार केला आहे. राष्ट्रपती 7 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करणं ही आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे, असं खासदार संभाजी छत्रपती म्हणाले आहेत.