bidi-village-khanapur-belgaum-grampanchayt-pdo-and-employees-party-office-work-बिडी-खानापूर-बेळगाव-bidi-khanapur-belgaum.jpg | बेळगाव : सरकारी बाबुंसह कर्मचार्‍यांच्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : सरकारी बाबुंसह कर्मचार्‍यांच्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. खानापूर : खानापूर तालुक्यातील बिडी ग्रामपंचायतीसह खानापूर तालुक्यातील काही ग्रापंच्या पिडीओंनी कचेरीत लोकांना तिष्ठत ठेवून ओली पार्टी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत तहसीलदार आणि तालुका पंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. गावपातळीवर पिडीओंच्या मनमानीबाबत अनेक तक्रारी ऐकू येतात. त्याहून अधिक धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील बिडी गावात घडला आहे.
बिडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांसह तालुक्यातील अन्य काही ग्राम पंचायतींच्या पिडीओ व अन्य कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यात ओली पार्टी केली. यावेळी ग्रा. पं. कचेरीत कामासाठी आलेल्या लोकांना तिष्ठत ठेवून कचेरीजवळील खुल्या जागेत हि पार्टी करण्यात आली. पिडीओ व कर्मचारी मौजमस्ती करण्यात मग्न झाले. काही लोकप्रतिनिधींनी हे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केले असून याबाबत तहसीलदार आणि तालुका पंचायत मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. कामाच्या वेळेत कचेरीत आलेल्या लोकांना तिष्ठत ठेवून सरकारी गणवेशात, गळ्यात ओळखपत्र घालून पार्टी करण्यात मग्न असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पार्टीचे दृश्य आता सर्वत्र व्हायरल झाले आहे.
या पार्टीमध्ये पिडीओ गणेश के. एस., भीमाशंकर, मुतण्णा गुरव, सचिव नेत्रावती एम. डी., नेत्रावती गिरी आदी सहभागी झाल्याचे दिसून येते. त्यांच्याविरोधात बिडी ग्रा. पं. सदस्यांनी तहसीलदार व ता. पं. मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.