बेळगाव : लॉकडाउन होणार असल्याची अफवा

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक प्रवेशासाठी 'आरटीपीसीआर' सक्ती Omicron Variant CoronaVirus

बेळगाव : सरकारने कोविड-19 निर्बंध वाढविण्यात येतील, मात्र लॉकडाउन केले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तरीही काहीजण सोशल मीडियावर लॉकडाउन होणार असल्याची अफवा पसरवत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे. मात्र, नागरिकांनी अफवांकडे दुर्लक्ष करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होते.
दक्षिण आफ्रिकेतील काही देशांत कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आल्याने देशांमध्येही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना होत आहेत. काही ठिकाणी पुन्हा कोरोना रुग्ण आढळनंतर प्रवासाकरिता आरटीपीसीआर सक्तीचे केले आहे. अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारून तपासणी सुरू आहे. CoronaVirus सरकारने संसर्ग वाढू नये याकरिता मास्कसह इतर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. काहीजण जाणीवपूर्वक पुन्हा लॉकडाउन केले जाणार आहे. लवकर दुकाने बंद करण्याची सूचना केली जाणार आहे. नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. शाळा पुन्हा बंद होणार आहेत यासह विविध संदेश पाठवत आहेत. या संदेशामुळे अनेकांत संभ्रम निर्माण होत असून अनेकजण खरोखरच लॉकडाऊन लागू होणार आहे का, अशी विचारणा करीत आहेत.
कोरोना संकटामुळे अनेक महिने व्यवहार बंद असल्यामुळे अनेकांना मोठा आर्थिक फटका बसला. पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत असतानाच लॉकडाऊन होणार असल्याची अफवा पसरवित आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे. आता कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची भीती घालून आणखी दर कमी करण्याचे प्रयत्न व्यापाऱ्यांकडून सुरू आहेत.