गुजरातमधील गीर सोमनाथ समुद्रात मोठा अपघात, वादळामुळे 15 बोटी बुडाल्या; अनेक जण बेपत्ता

गुजरातमधील गीर सोमनाथ समुद्रात मोठा अपघात, वादळामुळे 15 बोटी बुडाल्या;
अनेक जण बेपत्ता

belgavkar.com | belgaum | belgavkar

IMD नुसार येत्या 48 तासांत येथे मुसळधार पाऊस पडू शकतो

गुजरातमधील गिर सोमनाथ येथे गेल्या रात्री सातत्याने सुरू असलेला पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे 13 ते 15 बोटी समुद्रात बुडाल्याची शक्यता आहे. या बोटीत काही मच्छीमारही होते. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवरील 8 ते 10 मच्छीमार अद्यापही बेपत्ता आहेत. कालपासूनच बिघडलेले हवामान पाहता, हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला होता.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागात कालपासूनच सतत्याने पाऊस सुरू आहे आणि IMD नुसार येत्या 48 तासांत येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. यासोबतच मच्छीमारांनाही 5 दिवसांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, ओडिशा आणि आंध्रला 'जवाद' या चक्रिवादळाचा धोकाही आहे. अहमदाबादेत IMD च्या क्षेत्रीय निदेशक मनोरमा मोहंती यांनी म्हटले होते, की गुजरातेत 30 नोव्हेंबरपासून पाऊस सुरू होईल. याच बरोबर 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत मच्छीमारांना उत्तर आणि दक्षिण गुजरातच्या किनारी भागासाठीही इशारा देण्यात आला आहे. 

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

गुजरातमधील गीर सोमनाथ समुद्रात मोठा अपघात, वादळामुळे 15 बोटी बुडाल्या; अनेक जण बेपत्ता
IMD नुसार येत्या 48 तासांत येथे मुसळधार पाऊस पडू शकतो

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm