बेळगाव : खडेबाजार पोलिसांकडून एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : जुगार अड्डयावर छापा टाकून खडेबाजार पोलिसांनी बुधवारी एकाला अटक केली. त्याच्याकडून 4300 रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. टिळक चौकातून रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यासाठी पथकाची स्थापना करून छापा टाकण्यात आला. त्यावेळी एका संशयिताला रंगेहाथ पकडण्यात आले.
दुसरा संशयित पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. या कारवाईत पोलिसांनी 4300 रुपयांची रक्कम जप्त केली आहे. खडेबाजार पोलिस ठाण्यात प्रकरणाची नोंद आहे.