कर्नाटक : दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एकाला कोरोनाची लागण

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : दक्षिण आफ्रिकेतून बंगळूरला आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्यात ओमीक्रॉनबाबत तपासणी करण्यात येत आहे. त्याला ओमीक्रॉनची लागण झाल्याचा अहवाल आल्यास संपूर्ण राज्यात आवश्यक खबरदारी घेण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री आर. अशोक यांनी दिली. ते म्हणाले, कोणालाही कोरोनाची लक्षणे असल्यास तत्काळ तपासणी करून घेणे आवश्यक आहे. देशाला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने खूप काही शिकवले आहे. त्यातूनच आता पुढील उपाययोजना आखाव्या लागणार आहेत. लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे असते.
दक्षिण आफ्रिकेतील कोरोना वेगळ्या पद्धतीचा आहे. त्यामुळे तो कोणता रोग आहे, हे अजून निश्चित व्हायचे आहे. त्या रोगाचा देशात किंवा राज्यातही रूग्ण आढळलेला नाही. केंद्राच्या मार्गदर्शनानुसार आम्ही काम करत आहोत. विमानतळावर तपासणी करत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या आहेत, अशी माहितीही मंत्री आर. अशोक यांनी दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेला कोरोनाचा नवीन व्हेरिअंट (New Corona Variant South Africa) जगात पुन्हा हाहाकार माजविण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यूएचओने या व्हेरिअंटला खूप वेगाने पसरणारे चिंताजनक स्वरुप असे म्हटले आहे. या व्हेरिअंटला ग्रीकमध्ये ‘ओमीक्रॉन’ नाव देण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांनंतर ही पहिल्यांदा डब्ल्यूएचओने वर्गीकरणाची घोषणा केली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक : दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एकाला कोरोनाची लागण

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm