बारावा महिना महागाईचा! टीव्ही पाहणे, मोबाइलवर बोलणे झाले महाग

belgavkar.com | belgaum | belgavkar

गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबरोबरच महागाईलाही सामोरे जात असलेल्या सामान्यांना वर्षाच्या अखेरच्या महिन्यातही महागाईपासून सुटकारा मिळालेला नाही. उलटपक्षी रोजच्या वापरातील टीव्ही आणि मोबाइल या वस्तूंचा वापरही आता 1 डिसेंबरपासून महाग झाला आहे. एवढेच नव्हे तर आगपेटीची किंमतही दुपटीने वाढली आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी वाढली असली तरी घरगुती सिलिंडरची किंमत ‘जैसे थे’ ठेवली आहे, हीच सामान्यांसाठी समाधानाची बाब आहे. 
मोबाइल सेवा पुरवणाऱ्या एअरटेल, व्होडाफोन व जिओ या कंपन्यांनी रिचार्ज प्लान महाग केले आहेत. सामान्यांना इंटरनेट तसेच टॉक टाइम रिचार्ज करताना वाढलेल्या दरांचा फटका बसेल. 

1 डिसेंबरपासून डीटीएच रिचार्ज 35 ते 50 टक्क्यांनी महाग झाले. स्टार प्लस, कलर्स, सोनी व झी या वाहिन्या पाहण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
एसबीआय क्रेडिट कार्डावर केलेल्या खरेदीच्या मासिक हप्त्याच्या व्यवहारावर ग्राहकांना 99 रुपयांचे प्रक्रिया शुल्क व त्यावरील कर द्यावा लागेल.  ही घोषणा केली असून हा निर्णय 1 डिसेंबरपासून अमलात आणला जाणार आहे.  

आगपेटी ‘भडकली’ : आगपेटीची किंमत 1 डिसेंबरपासून वाढून दुप्पट झाली. आगपेटीसाठी 1 रुपयाऐवजी 2 रुपये द्यावे लागतील. 14 वर्षांत पहिल्यांदाच ही वाढ झाली. 2007 मध्ये आगपेटीची किंमत 50 पैशांवरून 1 रुपया झाली होती.