maharashtra-kolhapur-mla-chandrakant-jadhav-death-202112.jpg | कोल्हापूर : आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन | belgaum news | belgavkar बेळगावकर

कोल्हापूर : आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

belgavkar.com | belgaum | belgavkar

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे गुरुवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून हैदराबाद मधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, उपचार सुरू असताना आज गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी एक वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव कोल्हापुरात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजत आहे. आमदार जाधव यांना दीड वर्षात दोन वेळा कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. मध्यंतरी प्रकृती ठणठणीत झाल्याने ते पुन्हा आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय झाले होते. मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू त्यांना हैदराबाद मध्ये दाखल करण्यात आले होते.
2019 ला जाधव कोंग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला होता. जाधव यांचा कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळाशी फुटबॉललच्या माध्यमातून थेट संपर्क होता. तसेच जाधव इंडस्ट्रीजच्या माध्यमातून त्यांनी हजारो जणांना रोजगार दिला होता. तसेच आमदार जाधव यांनी राजकीय व सामाजिक कार्यातून मोठा जनसंपर्क निर्माण केला होता.
आमदार जाधव यांच्या निधनाबद्दल कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांचे हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. निवडणुकीच्या आधी केवळ पंधरा दिवस काँग्रेसमध्ये प्रवेश करून 2019 साली त्यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता. अतिशय मनमिळावू आणि लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सगळ्यांचे लाडके आण्णा म्हणून ते परिचित होते.राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात ते अधिक व्यस्त असत.