बेळगाव : आता बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकी चे वारे....

बेळगाव : आता बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकी चे वारे....

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते एकत्र आल्यानंतर आता बेळगाव शहर समितीतही (मध्यवर्ती आणि शहर समिती) एकीचे वारे वाहू लागले आहेत. शहर समिती एकी संदर्भात माजी महापौर व माजी नगरसेवकांची बैठक मराठा सांस्कृतिक भवनात पार पडली आहे. माजी महापौर किरण सायनाक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बैठकीत सर्व समिती नेत्यांना एकत्र आणून एकीचा करण्याचा निर्णय झाला आहे.
सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे, स्थानिक तसेच विधानसभा निवडणुकीतील यशासाठी आतापासूनच प्रयत्न करणे, निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी दूर दृष्टिकोनातून व्युव्हरचना करणे, महानगरपालिकेतील निवडणुकीतील अपयशाची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घेणे, यासाठी सर्व नेते व कार्यकर्त्यांना एकत्र करणे. यासंदर्भात पुढील काळात व्यापक बैठक घेऊन एकी संदर्भात तयारी करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या बैठकीला माजी महापौर महेश नाईक, सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू मुतगेकर, संजय शिंदे, माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, राकेश पलंगे, मनोहर हलगेकर, राजू बिर्जे, विजय भोसले, वैशाली कुगजी, मेघा हळदणकर, मीनाक्षी चिगरे, रूपा नेसरकर, सुधा भातकांडे आदी उपस्थित होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : आता बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकी चे वारे....

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm