t20-world-cup-2021-australia-vs-south-africa-wicket-keeper-batsman-quinton-de-kock-sad-dismissal.jpeg | T20 World Cup: नशीबच फुटकं! दुर्दैवी पद्धतीनं Out झाला क्विंटन डिकॉक Video | belgaum news | belgavkar बेळगावकर

T20 World Cup: नशीबच फुटकं! दुर्दैवी पद्धतीनं Out झाला क्विंटन डिकॉक Video

belgavkar.com | belgaum | belgavkar

T20 World Cup च्या सामन्यांना आजपासून सुरुवात झाली आहे. रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. तर आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 20 ओव्हरमध्ये 9 बाद 118 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 119 धावांचे लक्ष्य दिले. या लक्षाच्या पाठलाग करताना दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 19.4 षटकात 5 बाद 121 धावा करत हा सामना 5 विकेटने जिंकला.
पहिल्या सुपर 12 सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (SA vs AUS) यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अँरॉन फिंचने नाणेफेक जिंकली. फिंचने पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये अत्यंत दुर्देवी पद्धतीनं क्विंटन डिकॉक आऊट झाला. या व्हिडीओमध्ये पाहून शकता पाचव्या ओव्हरमध्ये क्विंटन डिकॉकने आलेला बॉल उलटा मारला आणि रन काढण्यासाठी पुढे सरकला. मात्र हा बॉल स्टम्पवर पडला. त्यामुळे डिकॉक आऊट झाला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ICC T20 विश्वचषक 2021 चा बहुचर्चित सामना रविवार 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.

टीम इंडियाचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (wk), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह