लेहेंग्यात ठेवलेलं 3 किलो ड्रग्ज

belgavkar.com | belgaum | belgavkar

लेहेंग्याच्या फॉलमध्ये लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवले जात होते 3 किलो ड्रग्ज, NCB नं केली कारवाई

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) हैदराबाद झोननं एक मोठा खुलासा केला आहे. कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज ऑस्ट्रेलियाला पाठवली जात असताना एनसीबीनं मोठी कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये स्यूडोफेड्रिन ड्रग्जचा (Pseudoephedrine Drugs) मोठा साठा असल्याची माहिती आहे. 3 किलो ड्रग्ज लेहेंग्यामध्ये लपवून घेऊन जात होते. लेहेंग्याच्या फॉलमध्ये हे ड्रग्ज लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी सुरू होती.

NCBच्या टीमला गुप्त माहिती मिळाली होती की, ड्रग्ज पेडलर्स मोठ्या प्रमाणात स्यूडोफेड्रिन ड्रग्स ऑस्ट्रेलियाला पाठवण्याची तयारी करत आहेत. गुप्तचर माहितीच्या आधारे, जेव्हा NCB च्या TSU बेंगळुरूनं चेन्नईतील कन्साइनरची ओळख पटवली तेव्हा त्याच्यामध्ये ड्रग्ज आढळून आले. एनसीबी चेन्नई टीमनं 2 दिवसांच्या दीर्घ कालावधीसाठी माल पाठवणाऱ्याचा पत्ता ओळखला आणि 22 ऑक्टोबर रोजी त्याला चेन्नई येथे पकडले. तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार, हे पार्सल नरसापुरम, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश येथून बुक केलं होतं आणि ते ऑस्ट्रेलियाला जात होते.
असं म्हटलं जात आहे की, ड्रग्ज लेहेंग्यामध्ये अशा प्रकारे लपवण्यात आले होते की फॉलच्या आत काही लपवलं आहे याची भनक ही लागणार नाही. सुरुवातीला एनसीबी टीमला चुकीची माहिती मिळाल्याचं वाटलं. मात्र, नंतर कसून तपास केला असता, लेहेंग्याच्या फॉलमध्ये हे ड्रग्ज लपवण्यात आले होते. ड्रग्ज तस्करांनी बनावट पत्ते आणि कागदपत्रांचा वापर केल्याचं तपासात उघड झाले आहे. दरम्यान एनसीबी चेन्नईच्या टीमनं 2 दिवसांच्या दीर्घ कालावधीसाठी माल पाठवणाऱ्या व्यक्तीचा पत्ता शोधून काढला आणि त्याला 22 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये पकडलं.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

लेहेंग्यात ठेवलेलं 3 किलो ड्रग्ज
लेहेंग्याच्या फॉलमध्ये लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवले जात होते 3 किलो ड्रग्ज, NCB नं केली कारवाई

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm