बेळगाव : गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. निपाणी : लखनापूर (ता. निपाणी) येथे गरोदर विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या पतीला निपाणी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. बसवराज कमते (रा. गोडचिनमलकी, ता. गोकाक) असे त्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुजाता बसवराज कमते (वय 19, रा. गोडचिनमलकी) महिनाभरापूर्वी बाळंतपणासाठी माहेरी लखनापूर येथे आल्या होत्या. गुरुवारी सकाळी पतीसोबत त्यांचे फोनवरुन बोलणे झाले होते.
त्यानंतर नजिकच्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी सुजाताच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत पतीशी फोनवरुन बोलल्यानंतर सुजाताने आत्महत्या केल्याचे म्हंटले आहे. त्यानुसार सुजाताचा पती बसवराजला याला अटक करून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली आहे.