benakanhalli-village-belgaum-youth-suicide-murder-case-sanjaypatil.jpg | बेळगाव : प्रेमप्रकरणातून बेनकनहळ्ळी गावात युवकाची आत्महत्या की खून...??? | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : प्रेमप्रकरणातून बेनकनहळ्ळी गावात युवकाची आत्महत्या की खून...???

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बेनकनहळ्ळी गावातील युवकाचा झाडावर लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह क्रांतीनगर (गणेशपुर) येथे शनिवार सकाळी आढळला आहे. संजय भरमा पाटील (वय 30, रा. मारुती गल्ली, बेनकनहळ्ळी) असे त्याचे नाव आहे. संजय हा कुली काम करत होता. ही माहिती गावात पसरताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गावातच चाललेल्या प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. प्रेमप्रकरणातून काल शुक्रवारी रात्री युवकाला मारहाण झाली होती. त्यानंतर युवक घाबरून पळून गेला होता. त्यानंतर आज शनिवारी सकाळी युवकाचा झाडावर लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळलायं. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.