belgaum-borgal-village-hukkeri-5-committed-suicide-family-belgaum-suicide.jpg | बेळगाव : धक्कादायक! अख्ख कुटुंब संपलं; 4 मुलांना विष पाजून बापाची आत्महत्या; | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : धक्कादायक! अख्ख कुटुंब संपलं; 4 मुलांना विष पाजून बापाची आत्महत्या;

belgavkar.com | belgaum | belgavkar

माजी सैनिकाच्या कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या

मी ₹ 20000 ठेवले आहेत, ते वापरा आणि अंत्यसंस्कार करा : डेथ नोट सापडली

बेळगाव : कोरोनाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली असताना, इकडे बेळगाव जिल्ह्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना आज सकाळी समोर आली आहे. हुक्केरी तालुक्यातील बोरगळ गावात रात्री तीन मुली व मुलग्यासह पित्याने आपल्या चार मुलांना विष पाजून स्वतःही आत्महत्या केली. वडील गोपाळ दुंडाप्पा हादीमनी (वय 46) यांनी सौम्या (19), श्वेता (16), साक्षी (11), सृजन (8) या मुला-मुलींना विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांची पत्नी कोरोना महामारीत काळ्या बुरशीमुळे मरण पावली होती. बापाने चार मुलांसह आत्महत्या केल्याचे उघड झाले.
- माजी सैनिकाने चार मुलांसह संपवली जीवनयात्रा;
गोपाळ हादीमनी हे माजी सैनिक होते. त्यांच्या पत्नीचे माहेर कणगले आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर बोरगळ गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. गोपाळची पत्नी जया यांचा 6 ​​जुलै रोजी कोरोनाच्या काळ्या बुरशीमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना घडल्यामुळे त्यांनी याच कारणामुळे आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान घरी अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. ही घटना संकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
belgaum-borgal-village-hukkeri-5-committed-suicide-family-belgaum.jpg | बेळगाव : धक्कादायक! अख्ख कुटुंब संपलं; 4 मुलांना विष पाजून बापाची आत्महत्या; | belgaum news | belgavkar बेळगावकर
मी ₹ 20000 ठेवले आहेत, आमच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचा उपयोग करा. मृत निवृत्त योद्ध्याची डेथ नोट पलब्ध होती. अंत्यसंस्कार करणार्‍यांचे आभार... कुटुंबाने डेथ नोट लिहून सुसाईड केली. याची माहिती पोलिसांनी दिली असून यामागे अन्य कोणतेही कारण नाही. एकाच कुटुंबातील पाच जणांनी एकाचवेळी आपले जीवन संपविले. त्यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच या मोठ्या घटनेमुळे गावात स्मशान शांतता पसरली आहे.