बेळगाव : पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू 

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : ऊस तोडणी करत असताना पाणी आणण्यास गेलेल्या गांजपूर (धारूर, जि. बीड, महाराष्ट्र) येथील एका उसतोड कामगाराचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. तानाजी संभाजी थोरात (वय 35) असे मृत उसतोड कामगाराचे नाव आहे. तो येथील एका सहकारी साखर कारखाना येथे ऊसतोडणीचे काम करण्यास गेला होता. 
तालुक्यातील गांजपूर येथील तरुण तानाजी थोरात हा सहकारी साखर कारखान्यात ऊस तोडणीसाठी पंधरा दिवसा पूर्वी गेलेला होता. शुक्रवारी दुपारी तो ऊस तोडणी करत असलेल्या शेतातील विहिरीत पाणी आणण्यासाठी गेला. यावेळी अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी आई असा परिवार आहे. गरीब कुटुंबातील मोल मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज दुपारी गांजपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू 

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm