बेळगाव शहरातील रिक्षाचालकांची शाळा घेत कडक सूचना

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : रिक्षाचालकाने आमननगारात केलेली मारहाण, वाढती गुन्हेगारी व मॉरल पोलिसींगच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकार्‍यांनी बेळगाव शहरातील रिक्षा चालकांशी संवाद सुरू केला आहे. वेगवेगळ्या रिक्षा स्टॅन्डना भेटी देवून अधिकारी रिक्षाचालकांना मार्गदर्शन करत आहेत. मॉरल पोलिसींगच्या वाढत्या प्रकारामुळे बेळगावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमिवर पोलीस दलाने जागृतीचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. रिक्षा चालकांनी प्रवाशांशी कसे वागावे या विषयी त्यांना सूचना करण्यात येत आहेत. संपूर्ण शहरात हा उपक्रम सुरू आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.