बेळगाव : चिदंबरनगर येथे नव्या बांधकामावरील लोखंडाची चोरी;

बेळगाव : चिदंबरनगर येथे नव्या बांधकामावरील लोखंडाची चोरी;

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : राजारामनगर मार्ग चिदंबरनगर येथे एका नव्या बांधकामासाठी ठेवलेले लोखंड चोरीस गेले आहे. मंगळवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून शुक्रवारी यासंबंधी उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गोविंदराव श्रीराम कट्टी यांनी फिर्याद दिली आहे. घर बांधकामासाठी श्रीराम यांनी 10 एमएमचे लोखंडी बार खरेदी केले होते.
7 ऑक्टोबर रोजी ₹ 40000 रुपये देऊन त्यांनी लोखंड खरेदी केले होते. हे लोखंड बांधकामाच्या ठिकाणी ठेवण्यात आले होते. गेल्या सोमवार 18 ऑक्टोबरच्या रात्री 10 पासून 19 ऑक्टोबरच्या दुपारी मध्यरात्री 12.30 यावेळेत चोरट्यांनी लोखंड चोरले आहे. या संबंधी उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक धिरज शिंदे पुढील तपास करीत आहेत.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : चिदंबरनगर येथे नव्या बांधकामावरील लोखंडाची चोरी;

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm