gokak-painting-college-building-fallen-death-gokak-falls-painter-202110.jpg | बेळगाव : काॅलेज इमारतीवरून पडून पेंटरचा मृत्यू | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : काॅलेज इमारतीवरून पडून पेंटरचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव ता. गोकाक : गोकाक येथील शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयाच्या नवीन इमारतीला रंग लावताना तोल जाऊन खाली पडल्याने पेंटरचा मृत्यू झाला. आनंद सत्यप्पा नाईक (वय 35, रा. गोकाक फॉल्स) असे या पेंटरचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या शासकीय पदवीपूर्व महाविद्यालयाच्या इमारतीचे रंगकाम करण्यात येत आहे.
त्यासाठी आनंद इमारतीवर चढला होता. त्यावेळी अचानक त्याचा पाय घसरल्याने तो खाली पडला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृत आनंदची पत्नी पूजा नाईक हिने पोलिसात फिर्याद दिली आहे. गोकाक पोलिस अधिक तपास करीत आहेत.