black_day_1_november_kaala_din_simabhag.jpg | बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यानातून निघणार काळ्यादिनाची निषेध फेरी | belgaum news | belgavkar बेळगावकर

बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यानातून निघणार काळ्यादिनाची निषेध फेरी

belgavkar.com | belgaum | belgavkar

असा असेल मार्ग

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीने 1 नोव्हेंबर काळ्यादिनाची निषेध फेरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्यानातून निघणार असून मराठा मंदिर येथे सांगता होणार आहे. या फेरीत ध्वनीक्षेपक लावण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याकडे शुक्रवारी केली. जिल्हाधिकारी हिरेमठ यांना दिलेल्या माहितीनुसार 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वा. संभाजी उद्यान येथून निषेध फेरीला सुरवात होणार आहे.
तानाजी गल्ली, रेल्वे गेट, भांदूर गल्ली, हेमूकलानी चौक, स्टेशन रोड, शिवाजी रोड, रामलिंगखिंड गल्ली, हेमूकलानी चौक, ताशिलदार गल्ली, फुलबाग गल्ली, शनी मंदिर, रेल्वे ओव्हर ब्रिज, कपिलेश्वर मंदिर, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, पोलिस वसाहत, बसवाण गल्ली, नार्वेकर गल्ली, बालाजी मंदिर, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, काकेरु चौक, बसवाण गल्ली, गणेशपूर गल्ली, काकेरू चौक, जेड गल्ली, डाक बंगला, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, खडेबाजार, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल मार्गे मराठा मंदिरपर्यंत निघणार आहे.
मराठा मंदिर येथे सकाळी 11 वाजता जाहीर सभा होणार आहे. या फेरीला ध्वनीक्षेपकाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण - पाटील आदी उपस्थित होते.