बेळगाव : बसवणकुडची येथे खांबावर पडलेल्याचा मृत्यू

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : बसवणकुडची येथे रस्त्याच्या कडेला लोखंडी खांबावर अनोळखी नेसरगी येथील व्यक्ती पडली होती. येणारे जाणारे पहात होते. परंतु, त्याला कोणीही मदत करत नव्हते. येथून निघालेले काँग्रेसचे युवानेते मृणाल हेब्बाळकर यांनी आपले वाहन थांबवून या व्यक्तीला मदत करत रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचाराचा उपयोग न होता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
बसवणकुडचीजवळ लोखंडी खांबावर अंदाजे 40 वर्षीय व्यक्ती पडली होती. सांबरा रस्त्यावर गर्दी असूनही त्याच्यासाठी कोणीही थांबत नव्हते. काँग्रेसचे युवानेते मृणाल हेब्बाळकर सुळेभावीला निघाले होते. त्यांनी वाहन थांबवून पाहिले असता सदर व्यक्ती अत्यवस्थ असल्याचे आढळून आले. त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेला फोन लावला, शिवाय मारीहाळ पोलिसांनाही याची माहिती दिली. रुग्णवाहिका आली व पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने त्याला रूग्णालयात नेले. परंतु, त्याचा मृत्यू झाला.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : बसवणकुडची येथे खांबावर पडलेल्याचा मृत्यू

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm