बेळगाव : मुचंडीत 6 जणांना अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : मुचंडी (ता. बेळगाव) येथील एका जुगारी अड्डयावर छापा टाकून मारिहाळ पोलिसांनी 6 जुगाऱ्यांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून ₹ 10,120 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मुचंडी येथील गंगीकोळ्ळ परिसरात अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बी. एस. मंटूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून सहा जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायदा 87 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे. मारिहाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.