बेळगाव : पहिली ते पाचवी शाळा नियमावली

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : सोमवारपासून पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू होणार असल्याने शाळांमध्ये आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात झाली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत. तसेच शिक्षण खात्याने सुरवातीचे पहिले पाच दिवस 10.30 ते 1.30 या वेळेत वर्ग भरविले जाणार आहेत. तसेच सुरुवातीला विद्यार्थ्यांना तयार माध्यान्ह आहाराचे वाटप केले जाणार नसून 2 नोव्हेंबर नंतर पूर्णवेळ शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार दिला जाणार आहे.
शाळा सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या वह्या, दप्तर व इतर प्रकारचे साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग सुरू झाली असून शाळा सुरू होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
25 ते 30 ऑक्टोबर पर्यंत सर्व शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग अर्धा दिवस भरविने

2 नोव्हेंबर पासून दररोज पूर्ण दिवस शाळा सुरू

विद्यार्थ्यांना वर्गात हजर राहणे सक्तीचे नाही
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचे संमती पत्र आवश्यक

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मास्क वापरणे सक्तीचे

पन्नास वर्षांवरील सर्व शिक्षकांना फेस शिल्डचा वापर सक्तीचा
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेणे सक्तीचे
पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार नाही
पूर्ण दिवस शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहार वितरण
विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पाण्याची सोय करावी
दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान एक मीटरचे अंतर असावे
विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करावे
विद्यार्थ्यांमध्ये खोकला, सर्दी तापाची लक्षणे आढळल्यास घरी पाठवणे
शाळेत विद्यार्थ्यांमध्ये कोरोना आढळून आल्यास संपूर्ण शाळेत निर्जंतुकीकरण करावे