बेळगाव : आमदारांचे 'Temple Run'

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : नुकतेच उत्तराखंड येथील केदारनाथ यात्रेवरून परतलेले माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी शुक्रवारी कोल्हापूर अंबाबाई मंदिरात (Kolhapur Temple) जाऊन अंबाबाईचे दर्शन घेतले. आमदार जारकोहीळी गेले पंधरा दिवस केदारनाथ यात्रा आणि दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी आमदार जारकीहोळी म्हणाले, आपण अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी नेहमी येतो. कोरोनामुळे वर्षापेक्षा अधिक काळ मंदिर बंद होते. त्यामुळे वर्षभर येता आले नाही.
अंबाबाईकडे राज्यातील जनतेच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना केली आहे. यावेळी माजी आमदार भाजपा अध्यक्ष संजय पाटील, युवानेते उत्तम पाटील, दलित क्रांती सेनेचे अशोककुमार असोदे, शिरीष कमते, इम्रान मकानदार, अमोल नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.