बेळगाव : म्हणून त्याने न्यायालयामसोर वकिलाला मारहाण केली

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : संगोळ्ळी रायण्णा सोसायटीत ठेवलेली ठेव चार वर्षांनंतरही मिळवून दिली नसल्याच्या रागातून अशिलाने वकिलाला मारहाण केली. शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास ग्राहक न्यायालयामसोर हा प्रकार घडला. संगोळ्ळी रायण्णा सोसायटीतील मुदत ठेव परत मिळण्यासाठी यल्लाप्पा एम. बसरीकट्टी (रा. देसूर) यांचा खटला अ‍ॅड. आदिल एम. सौदागर लढवत आहेत. ग्राहक न्यायालयात हा खटला सुरू असून शुक्रवारी तारीख असल्याने यल्लाप्पा आले होते.
परंतु, न्यायाधीशांनी पुढील तारीख दिली. ही माहिती यल्लाप्पा यांना अ‍ॅड. सौदागर देत असताना यल्लाप्पा चिडले. वकिलांना एकेरी भाषा वापरत गेल्या चार वर्षांपासून फक्त तारीखवर तारीख मिळत आहे. फी घेण्याशिवाय तू काय केलेस, असे म्हणत अर्वाच्च शिवीगाळ करत मारबडव केली. याप्रकरणी अ‍ॅड. सौदागर यांनी मार्केट पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार यल्लाप्पा बसरीकट्टी यांना अटक झाली.
वकीलपत्र न घेण्याचे आवाहन : अ‍ॅड. आदिल सौदागर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत बेळगाव बार असोसिएशनने संशयित हल्लेखोराचे वकीलपत्र कोणीही घेऊ नये, असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे. आपल्या सहकार्‍याच्यावर झालेल्या या हल्ल्याचा आम्ही निषेध करत असून बार असोसिएशनच्या कोणत्याही सदस्याने बसरीकट्टी याचे वकीलपत्र घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.