बेळगाव : क्रांतीनगर येथे एकाला अटक

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : क्रांतीनगर येथे गोवा बनावटीचे 30 हजाराचे मद्य जप्त केले. या प्रकरणी एकाला अटक केली असून राजेश केशव नाईक (वय 40, रा. कुमारस्वामी लेआऊट) असे संशयिताचे नाव आहे. गुरुवारी कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली.
गणेशपूर परिसरातील क्रांतीनगर येथील डोंबारवाडीत एकजण गोव्याचे मद्य बेकायदेशीररित्या आणून त्याची विक्री करत असल्याची माहिती कॅम्पचे निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन सकाळी 11 वा. छापा टाकला असता राजेश केशव नाईक हा क्रांतीनगर येथे भाडोत्री घर घेऊन तेथे मद्य विक्री करत असल्याचे आढळून आले. या घरात व्हिस्कीसह विविध प्रकारच्या मद्याच 78 बाटल्या सापडल्या. त्या जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल केलायं.