पेट्रोलला आले 'अच्छे दिन'! दरवाढीचा सपाटा कायम

belgavkar.com | belgaum | belgavkar

सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली आहे. आज डिझेलचे दर 33 ते 37 पैश्यांनी वाढले आहेत तर पेट्रोलचे दर 30 ते 35 पैश्यांनी वाढले आहेत. अनेक राज्यांमध्ये इंधनाचे भाव शंभरीच्या पार गेले आहेत. देशात दररोज वाढणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक हैराण आहे.
दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 107.24 रुपये तर डिझेलचे दर 95.97 रुपये प्रती लीटर आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 113.12 रुपये तर डिझेलची किंमत 104.00 रुपये प्रती लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 107.78 रुपये तर डिझेलचे दर 99.08 रुपये प्रती लीटर आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 104.22 रुपये लीटर आहेत तर डिझेलचे दर 100.25 रुपये प्रती लीटर आहेत.
प्रमुख शहरांमध्ये असे आहेत भाव
शहर डिझेल पेट्रोल
दिल्ली 95.97 107.24
मुंबई 104.00 113.12
कोलकाता 99.08 107.78
चेन्नई 100.25 104.22
या राज्यात पेट्रोल शंभरीपार : मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिसा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे भाव 100 रुपयांच्या पार गेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत सर्वाधिक आहे.