कर्नाटक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'ड्रग अॅडिक्ट'; माफी मागावी अन्यथा...;  येडियुराप्पांची नाराजी

कर्नाटक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'ड्रग अॅडिक्ट';
माफी मागावी अन्यथा...;
येडियुराप्पांची नाराजी

belgavkar.com | belgaum | belgavkar

कर्नाटक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'ड्रग अॅडिक्ट' म्हटल्याबद्दल काँग्रेसने भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा दिला. दरम्यान, या वक्तव्याबद्दल कटील यांनी माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी तातडीने कटील यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना पक्षातून काढून टाकावे. अन्यथा काँग्रेस कार्यकर्ते भाजपविरोधात उग्र आंदोलन करतील, असे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास म्हणाले.
वाढत्या तेलाच्या किमती, बेरोजगारी, दारिद्र्य, महागाई यासारख्या ज्वलंत समस्यांवर जनतेचे लक्ष वळवण्यासाठी बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. कटील, असे श्रीनिवास यांनी माध्यमांना सांगितले. कटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत श्रीनिवास म्हणाले की, राष्ट्रीय नेत्यांविरोधात बदनामीकारक टिप्पणी करण्यापूर्वी भाजप नेत्यानी त्यांची स्थिती जाणून घ्यावी. सिंदगी येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे मुख्य सचिव व कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला यांनी कटील यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. राहुल गांधी याच्याविरुध्द असे वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांची यावरून मनोवृत्ती व संस्कृती दिसून येते, असे ते म्हणाले.
येडियुराप्पांची नाराजी : कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी ड्रग पेडलर असल्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्या आक्षेपार्ह टिप्पणीवर माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी नाराजी व्यक्त केली. कोणीही या प्रकारचे वक्तव्य करू नये. कोणाचा अवमान होईल असे वक्तव्य करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

कर्नाटक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'ड्रग अॅडिक्ट'; माफी मागावी अन्यथा...; येडियुराप्पांची नाराजी

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm