बेळगाव - खानापूर : तरुणाची आत्महत्या

बेळगाव - खानापूर : तरुणाची आत्महत्या

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव - खानापूर : तरुणाची आत्महत्या
बेळगाव ता. खानापूर : नैराश्यातून तरुणाने शिवारात आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. जोतिबा देवाप्पा गुरव (वय 26, रा. कुपटगिरी रस्ता खानापूर) असे त्याचे नाव आहे. बुधवारी रात्रीपासून तो बेपत्ता झाला होता. कुटुंबीय त्याचा सर्वत्र शोध घेत होते. सकाळी कुपटगिरी क्रॉस येथील शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला.
मावस भावाला पाठवलेल्या संदेशात त्याने आपण जीवनाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगून याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले होते. घटनास्थळी मिळालेली विषाची बाटली आणि तोंडातून फेस आल्याने त्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या पश्चात आई, वडील भाऊ असा परिवार आहे. तो येथील एका पतसंस्थेत कामाला होता.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव - खानापूर : तरुणाची आत्महत्या

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm