बेळगाव : कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथून युवती बेपत्ता झाल्याची तक्रार काकती पोलीस स्थानकात दाखल झाली आहे. अक्षता लक्ष्मण बिजगर्णीकर (वय 19, रा. कुद्रेमानी) असे बेपत्ता युवतीचे नाव आहे. सोमवारी सदर युवती सकाळी 10 वाजता संगणक शिकवणीसाठी जात असल्याचे सांगून घरातून गेली होती. ती परतलीच नाही, अशी तक्रार तिचे वडील लक्ष्मण बिजगर्णीकर यांनी दिली आहे.
घरातून बाहेर पडताना तिने पिस्ता रंगाचा चुडीदार, गुलाबी रंगाची पँट परिधान केली आहे. तिला हिंदी व मराठी बोलता येते. उंची 5.6 इंच असून, गहूवर्ण, अंगाने सदृढ असून, माहिती मिळाल्यास काकती पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.