बेळगाव : 22 एकरातील ऊस जळून खाक झाला

belgavkar.com | belgaum | belgavkar

बेळगाव : कागवाड तालुक्यातील तंगडी गावात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे 22 एकर ऊस जळून खाक झाला. मंगळवारी दुपारी ही दुर्घटना घडली. केपीसीसी सदस्य दिग्विजय पवारदेसाई यांच्या मालकीचा 15 एकर जागेतील ऊस, त्या शेजारील नामदेव चौगुले यांचा 2 एकरातील ऊस, मारुती चौगुला, तुकाराम पाटील, राम गायकवाड यांचा सुमारे 1.5 एकर असा एकूण 22 एकर जागेतील ऊस जाळून खाक झाला. अंदाजे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
दिग्विजय देसाई यांचे सचिव मुर्गप्पा लाटरी यांना आगीची कल्पना आली. पण, आग वेगाने पसरली. आसपासच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात आले. परिसरात 10 म्हशीही बांधण्यात आल्या होत्या. आल्या परंतु, सुदैवाने त्या सुरक्षित असल्याची माहिती मिळाली. सदर जागेवरील 1972 मध्ये जोडण्यात आलेल्या विजेच्या तारा जीर्ण झाल्या आहेत.
त्याचप्रमाणे या तारा जमिनीच्या माध्यमातून जोडण्यात असून वाऱ्याचा जोर वाढल्यास अनेकवेळा शॉर्ट सर्किट होते. हेस्कॉम अधिकाऱ्यांना कळविण्यात आले असून याबाबत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील शेतकरी करत आहेत. घटनास्थळी हेस्कॉम अधिकारी, निरीक्षण अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यासंदर्भात अथणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : 22 एकरातील ऊस जळून खाक झाला

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm