बेळगाव : युवकाचा खून धाब्यावरील वादावादीनंतर

बेळगाव : युवकाचा खून धाब्यावरील वादावादीनंतर

belgavkar.com | belgaum | belgavkar

belgaum-uchagav-village-youth-injured-youth-death-kallehol-cross-202110.jpg

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ क्रॉसजवळ अज्ञातांनी बिअरच्या बाटलीने हल्ला करून खून केलेल्या युवकाच्या खून प्रकरणाचा अद्याप तपास लागला नाही. जेवणाच्यावेळी धाब्यावर झालेल्या वादावादीतून खुनाचा हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली असून गुन्हेगारांचा अद्याप शोध लागला नाही. रामचंद्र लक्ष्मण कणबरकर (वय 32, रा. उचगाव) असे त्या युवकाचे नाव आहे. गुरुवार (14 ऑक्टोबर) रोजी सकाळी कल्लेहोळ क्रॉसजवळ रामचंद्र गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता शुक्रवारी दसर्‍याच्या दिवशी त्याचा मृत्यू झाला.
बुधवार (13 ऑक्टोबर) रोजी सायंकाळी 6 वाजता रामचंद्र आपल्या घरातून बाहेर पडला होता. रात्री वेंगुर्ला रोडवरील एका धाब्यावर तो जेवणाला गेला होता. धाब्यावर मित्रांबरोबर झालेल्या भांडण व वादावादीनंतर खुनाचा हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून तपास हाती घेतला आहे. आठ दिवसानंतरही आरोपींना अटक झाली नाही. याप्रकरणी बेळगाव शहरासह बेळगुंदी गावातील 10 - 15 युवकांची चौकशी पोलिसांनी केली आहे. उपलब्ध माहितीनुसार रामचंद्रचा खून कोणी केला? याचा उलगडा झाला आहे. मात्र पोलीस अद्याप गुन्हेगारांपर्यंत पोहोचले नाहीत.
मित्रांनी रामचंला फोन करून पार्टीत बोलावले. आपण जेवणासाठी जात असल्याचे आपल्या कुटुंबीयांना सांगून गेलेला मुलगा घरी न आल्याने कुटुंबाने रात्री उशिरा फोन केला. पण त्याचा लागला नाही. पार्टी संपल्यानंतर मध्यरात्री भांडण झाल्याची माहिती डीसीपी विक्रम आमटे यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून दिली आहे. जेवण आटोपून परतते वेळी तो कल्लेहोळ क्रॉस येथे थांबला असता पाठीमागून अज्ञाताकडून त्याच्या डोक्यात बियरच्या बाटलीने वार करण्यात आला. या घटनेत तो गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध अवस्थेत तिथंच पडला होता. गुरुवारी सकाळी मॉर्निंग वाकर्सनी जाणार्‍यांनी त्यावा बेशुद्धावस्थेत पाहून उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला. काकती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
एसीपीच्या नेतृत्वाखाली विशेष पोलिसांची टीम निर्मिती
खून प्रकरण गंभीरपणे घेणाऱ्या डीसीपी विक्रम आमटे यांनी आरोपींच्या शोधासाठी ग्रामीण एसीपी आणि काकती स्टेशन पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. फोन कॉल आणि टॉवर लोकेशनच्या आधारे 24 तासात आरोपींना अटक करण्याची आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.


विठोबाचे भक्त रामचंद्र
रामचंद्र हा दारू प्यायला लागल्याने त्याच्या कुटुंबाने पंढरपूर येथे जावून त्याला माळही घातली होती. त्यानंतर दारू सोडलेला रामचंद्र मित्रांसोबत संगतीने दोन महिन्यांनी पुन्हा दारु प्यायला लागला. त्यामुळे कुटुंब त्याचे लग्न करण्याची तयारी करत होते.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

बेळगाव : युवकाचा खून धाब्यावरील वादावादीनंतर
belgaum-uchagav-village-youth-injured-youth-death-kallehol-cross-202110.jpg

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm